spacer
white spacer
 
   
white spacer
white spacer
white spacer

स्मरणिका

...युरोपचि माती आपली माणसं...

नोकरी-व्यवसाय, शिक्षणासाठी युरोपात वास्तव्य करणारी आपण मराठी माणसं इथे संमेलनाच्या निमित्ताने एकत्र येणार आहोत. अशी बुध्दिजीवी माणसं एकत्र आल्यावर निखळ करमणुकीच्या जोडीने वैचारिक मंथन आणि देवाणघेवाण होणं अपरिहार्य आहे...

मराठी भाषा संस्कृती, चालीरीती या समान धाग्यांनी बांधलेले आपण युरोपीय मराठी... महाराष्ट्राच्या मातीत, तिथल्या संस्कृतीत आपली मुळं रुजलेली आहेत. युरोपात जे जे पाहतो, अनुभवतो, टिपतो, त्यातून महाराष्ट्राकडे, आपल्या संस्कृतीकडे, आपल्या देशाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी आपल्यात निर्माण होत आहे.

दोन संस्कृतींमध्ये दुवा म्हणून आपण वावरत आहोत… अनुभवसंपन्न होत आहोत. असेच काही अनुभव अणि विचार शब्दबद्ध करण्याची एक सुसंधी स्मरणिकेच्या निमित्ताने आली आहे.

शिवाय आम्ही ह्या निमित्ताने ई-सकाळ वर्तमान पत्रात दर पंधरवड्याला एक लेख प्रसिध्द करुन आणणार आहोत. सध्या प्रचलित असलेल्या फेसबुक’ ह्या संकेतस्थळावर ही आमचा एक गट आहे त्याचे नाव आहे-
European Marathi Sammelan.

http://www.facebook.com/group.php?gid=218270463070

तरी तुम्ही लिहिलेल्या लेखाची एक प्रत या संकेतस्थळावर नोंदवावी. लिखाण पडताळून पाहून त्यातील काही अंश ई-सकाळ मध्ये प्रसिध्द करण्यात येईल. त्यासाठी मी तुमच्या संपर्कात राहीनच.

आतापर्यंत तुम्ही तुमच्या लिखाणातून प्रतिसाद दिलातच... असाच अजून उदंड प्रतिसाद द्यावा अशी इच्छा आहे. म्हणून अजून काही नवीन विषय सुचवित आहे.

१. मराठी भाषा, इतिहास, कला, साहित्य आणि संस्कृती यावरील माहितीपर लेख
२. युरोपातील रोचक प्रवासवर्णन, युरोपातील एखादा आगळावेगळा, अविस्मरणीय अनुभव
३. विनो़दी लेख, कविता
४. एखाद्या आवडलेल्या मराठी पुस्तकाविषयी/ मराठीत झालेल्या भाषांतराविषयी
५. दोन संस्कृतींतील दुवा- अनुभव अणि आव्हानं
६. आजचा भारत- युरोपातून दिसणारं वास्तव अणि कल्पना
७. मी अनुभवलेलं प्रभावी व्यक्तिमत्त्व
८. सामाजिक, राष्ट्रीय, निसर्ग वर्णनात्मक, मानवी भाव-भावना दर्शविणारी कविता
९. लोकोपयोगी माहिती (तुमच्या देशातील)
१०. मला समजलेला "तुमचा देश" (उदा. मला समजलेले इंग्लंड)

यातील एखादा तरी विषय आपल्याला विचारास नक्कीच प्रवृत्त करेल आणि शब्दांचं रूप घेईल...
आपल्या उदंड प्रतिसादाच्या अपेक्षेत...
आपली संपादिका,
मेघाली रणदिवे
झुरिक, स्वित्सर्लंड
युरोपीय मराठी संमेलन २०१०, स्मरणिका
meghali27@gmail.com

Upload file :
File Type e.g. - .doc .pdf .jpg .gif
Our editor Meghali Randive will get in touch with you after you have uploaded your content.
Please visit the Sponsorship page to find out options place advertisements in our Smaranika.
Copyright 2009 - 2010 © EMS All Rghts Reserved  
Designed & Maintained by Omkar Multimedia Communication